लाइव न्यूज़
बीड:कोरोनाचा पहिला बळी; महिलेचा मृत्यू*
आष्टी(सिटीझन) तालुक्यातील सांगवी (पाटण )येथे कोरोनाबाधित आढळलेल्या ६५ वर्षिय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. कालच तिच्यासह सात जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते.मुळची पिंपळगाव ( ता.जि.नगर) येथील ती रहिवासी असून मुंबईहून सांगवी पाटण येथे नातेवाईकाकडे आली होती.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे तीन च्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
Add new comment