बीड जिल्ह्यात आणखी 7 पॉझिटिव्ह
बीड दि.17 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातील धोका दिवसेंदिवस वाढत आहे. काल दोन जणांचे पॉझिटिव्ह आल्यानंतर आज आणखी 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
बीड जिल्ह्यातून 29 रुग्णांचे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाडण्यात आले होते त्यापैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले मात्र उर्वरित सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात आता कोरोना बाधित यांची संख्या 9 झाली आहे. यामुळे खळबळ उडाली असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कोण आहेत आणखी 7 पॉजिटिव्ह
कोरोना बाधित मध्ये 66, 65, 43, 38, 36, 10, 6, अशी त्यांचे वय असून पाच पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्व 13 मे रोजी मुंबईहून निघाले होते. 14 तारखेला आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथेनातेवाईकांकडे आले होते. हे सर्व पिंपळगाव खुडा ता.अहमदनगर येथील रहिवाशी आहेत.
आता जिल्ह्यात एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 9 झाली आहे अशी माहिती डॉ.आर.बी.पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी दिली आहे.
Add new comment