बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ; सर्व काही जैसे थे मात्र पानटपरी, दारू दुकाने बंदच
बीड दि.17 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लॉकडाऊन 4 संदर्भात आपले नवीन आदेश काढले आहेत. जिल्ह्यामध्ये आजपासून दि. 31 मे पर्यंत संचारबंदी कायम राहणार असून यापूर्वीचा सम विषम तारखेचा फार्मूला कायम ठेवण्यात आला आहे. मात्र पान टपरी, तंबाखू , पान मसाला आणि दारूविक्री बंदच राहणार असल्याचे रेखावर यांनी आपल्या आदेशांमध्ये स्पष्ट केले आहे.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दि.17 मे रोजी लॉकडाऊन 4 संदर्भात नवीन आदेश काढले आहेत. दिनांक 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने काही नवीन आदेश किंवा नियम लागू होतात का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र जिल्हाधिकारी रेखावार यांनी पूर्वीचे नियम कायम ठेवले आहेत. सम-विषम तारखेचा फार्मूला कायम ठेवत यापूर्वी प्रमाणेच विषम तारखांना म्हणजेच एक दिवस आड सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र पान टपरी, तंबाखू विक्री आणि दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही.यापूर्वीच्या आदेशामध्ये ज्यांना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे, तेच आदेश कायम राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे
Add new comment