बीड जिल्हाधिकार्यांचा महत्वाचा निर्णय; सकाळी 7 ते 9.30 या वेळेतील दुकानांसांठी पासची गरज नाही
बीड, दि.4(सिटीझन):- जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दुपारी उशिरा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सकाळी 7 ते 9.30 या वेळे व्यतिरिक्त काम करण्याची परवानगी असलेल्या दुकाने व व्यावसायिकांनाच पास आवश्यक आहे. अन्यथा इतरांना हा पास घेण्याची आवश्यकता नाही असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितले असून यासंदर्भातील संदेश जिल्हा माहिती कार्यालयानेही प्रसिध्द केला आहे.
बीड जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज पहाटे काढलेल्या आदेशामध्ये काही दुकानांना एक दिवसाआड सकाळी 7 ते 9.30 या वेळेत सुट दिली आहे. मात्र या सर्व दुकानांसाठी पास घेणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी रेखावार यांनी आज दुपारी उशिरा नविन संदेश पाठवला असून त्यामध्ये एक दिवसाआड सकाळी 7 ते 9.30 या वेळेत ज्यांना आपली दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यांना पास घेण्याची आवश्यकता नाही असे म्हटले आहे. सकाळी 7 ते 9.30 या वेळेनंतर ज्या दुकानांना आणि व्यावसायकिंना परवानगी दिली आहे त्यांनाच पास बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
Add new comment