राष्ट्रवादीच्या गोटात सुंदोपसुंदी वातावरण? कर्जत जामखेड मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकारयांत ताळमेळ बसेना?

जामखेड - यासीन शेख 

विधानसभा निवडणूकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहेत. सत्ताधारी भाजपापुढे कडवे आव्हान उभे करण्यासाठी विरोधी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करण्यास सुरवात केली असली तरी कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात मात्र जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा ताळमेळ बसत नसल्याने आघाडीच्या विशेषता: राष्ट्रवादीच्या गोटात सुंदोफुंदीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला या भागाचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग व पणन खात्याचे मंत्री प्रा राम शिंदे यांनी अधिक मजबूत करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षाच्या मंत्रीपदाच्या माध्यमांतून जोरदार प्रयत्न केले. राम शिंदेंनी मजबूत केलेल्या बालेकिल्ला काबीज करण्याचे स्वप्न बघणारी राष्ट्रवादी भाजपाविरोधी वातावरण निर्मिती करण्यात सध्यातरी बॅकफुटवरच असल्याचे दिसत आहे. बूथबांधणी पासुन ते कार्यकर्ते व नेते यांच्या मनोमिलनात राष्ट्रवादीला मोठे यश येताना दिसत नाही. राष्ट्रवादीला खरोखरी भाजपाचा बालेकिल्ला उध्दवस्त करायचा असेल तर निष्ठावंतांसह जुन्या नव्यांचा योग्य ताळमेळ ठेवण्याबरोबरच तरूणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल

भाजपाची जमेची बाजू 

भाजपाकडे तगडे कार्यकर्त्यांचे असलेले जाळे भाजपासाठी जमेची बाजू असून राम शिंदे यांच्या विजयात हेच प्रामाणिक कार्यकर्ते ताकदीने यापुर्वी काम करताना दिसत होते. यंदाही भाजपातील प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी राम शिंदे यांच्या विजयासाठी कामाला लागली आहे.भाजपात वाद विवाद असले तरी नाराजांची निष्ठा राम शिंदे  असल्याने नाराज कार्यकर्ते राम शिंदेंसाठी पक्षातील बेबनाव जाहिर न करता राम शिंदे यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करताना मतदारसंघात दिसू लागले आहेत

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.