खाजगी सावकारकी च्या जाचाला कंटाळून चौघांविरोधात गुन्हे दाखल
खाजगी सावकाराच्या जाचाने त्रस्त झालेल्या युवकाने जामखेड पोलिसांत खाजगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी जामखेड पोलिसांत कलम 394 तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन अध्यादेश 2014 चे कलम 39, 45 चौघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध्यरित्या खाजगी सावकारकी करणार्या सावकाराविरोधात गुन्हे दाखल झाल्याने खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अशी की, फिर्यादी दिनेश अभिमान भानवसे ( रा वांगी ता करमाळा ) हल्ली रा रमेशखाडे नगर जामखेड हा जामखेड येथीलअंबिका कला केंद्रा पार्टी चालविण्याचे काम करतो. फिर्यादीकडे कला केंद्रामध्ये पार्टी चालविण्याचा परवाना आहे. कला केंद्रातील नर्तिकींना अॅडव्हान्स रक्कम द्यावयाची होती म्हणून फिर्यादीने खाजगी सावकार राहुल हिरामण अंधारे याच्याकडे उसनवार तीन लाख रूपयांची मागणी केली होती. परंतु सावकार अंधारे याने मी उसनवार पैसे देत नाही. तुला पैसे हवे असतील तर 20 रुपये शेकडा प्रमाणे तसेच सेक्युरीटी म्हणून सात ते आठ चेक दिले तरच मी पैसे देऊ शकतो. तुला या अटी मान्य असतील तरच पैसे मिळतील.
फिर्यादीस पैशाची गरज होती म्हणून त्याने सावकाराच्या अटी मान्य केल्य. खाजगी सावकार याने पैसे देताना सोनाली शत्रुघ्न धोत्रे व प्रीती चंद्रकांत लोंमटे यांच्यासमक्ष फिर्यादीला तीन लाख रुपये वीस रुपये शेकड्या याप्रमाणे व्याजाने दिले. पैसे दिल्यानंतर सावकाराने फिर्यादीकडून सेक्युरिटी म्हणून आठ चेक घेतले होते. फिर्यादीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जेऊर तालुका करमाळा या बँकेतील खात्याचे चेक नंबर 973921, 973922, 973923, 973924, 973926, 973927,973928, 973929 असे आठ कोरे चेक सही करून सावकार अंधारे याला दिले होते.
फिर्यादी व खाजगी सावकार अंधारे यांच्यात झालेल्या व्यवहारानुसार फिर्यादी दरमाह साठ हजार रुपये व्याज देत होता. व्याजासह मुदलीची परतफेड करताना फिर्यादीने सावरकार अंधारे याला आजवर सात लाख रूपये दिले आहेत. तसेच सावकार राहुल अंधारे याच्या सांगण्यावरून मित्र रमेश बी साठे यांच्या बँक खात्यावर फिर्यादीने 35 हजार रुपये टाकले आहेत. फिर्यादीने पूर्ण रक्कम दिलेली असताना सावकार राहुल अंधारे सतत पैशाची मागणी करत आहे. पैशासाठी शिवीगाळ करून मारहाण करून कुटुंबाला सतत त्रास देत आहे. फिर्यादी हा बाहेरगावचा राहणारा असल्यामुळे कुटुंब दहशतीखाली राहत आहे.
तू मला आणखी पाच लाख रुपये दे नसता तुझे आठ चेकवर मला वाटेल तेवढी रक्कम टाकीन व कोर्टात चकरा मारायला लावेल असा दम देत आहे सावकाराच्या वागण्यामुळे अर्जदाराची मानसिक स्थिती बिघडत चालली सावकाराच्या धमक्यांमुळे मित्र राम राळेभात यांनी 1 लाख 50 हजार रुपये राहुल आंधरे यास 15/32019 रोजी दिले आहेत. एवढ्यावर सावकाराचे भागत नसल्यामुळे सावकाराने फिर्यादीस फोन वरून 23/4/2019 रोजी चाकी गाडी घेऊन घरी येण्यास सांगितले. सावकार अंधारे यांच्या सांगण्यावरून फिर्यादीहा आपली गाडी घेऊन ( एम एच 24 व्हि 32 99 ) राहुल अंधारे यांच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर सावकार अंधारे व इतर तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी याच्या ताब्यातील गाडीची चावी हिसकावुन घेत फिर्यादीला बेदम मारहाण केली. यावेळी अंधारे याने फिर्यादीला दम दिला की तू मला आणखी चार लाख रुपये आणून दे तेव्हाच तूझी गाडी घेऊन जा
राहुल हिरामण अंधारे यांची मोठी खाजगी सावकारकी आहे त्यामुळे अनेक गरिब लोकांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत फिर्यादीने सर्व पैसे देऊनही फिर्यादी व कुटुंबातील लहान मुलांना मारहाण करत आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी दिनेश अभिमान भानवसे याच्या फिर्यादीवरून खाजगी सावकार राहूल हिरामण अंधारे व इतर तीनअनोळखी इसमांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला कलम 394 तसेच सावकारकीच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास हेड काँस्टेबल बापु गव्हाणे हे करत आहेत.
खाजगी सावकारकी सारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्याकडे देण्याऐवजी हेड काँस्टेबल देण्यात आल्याने या गुन्ह्याच्या पुढील तपासाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Add new comment