लाइव न्यूज़
केजमध्ये रिपाइचा तर आष्टीत भटके विमुक्तांचा मोर्चा

केज/आष्टी, (प्रतिनिधी):-केजमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्यावतीने रमाई घरकुल प्रश्नासह अन्य मागण्यांसंदर्भात आज दुपारी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणिय होती तर आष्टीमध्येही राईनपाडा येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ भटके विमुक्तांनी तहसिलवर मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

केजमध्ये आज दुपारी तहसिल कार्यालयावर रिपाइच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. जिल्हाकार्याध्यक्ष संदिपान हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठी होती. गायरान प्रश्नी, रमाई घरकुल प्रश्नी व सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी राहूल सरवदे, विकास मस्के, ईश्वर सोनवणे, भास्कर मस्के, रवि जोगदंड, अंबादास तुपारे, रमेश निशिगंध, कैलास जावळे आदिंची उपस्थिती होती. आष्टीमध्येही आज दुपारी भटके विमुक्त जाती जमातीच्यावतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या घटने मधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी साठी आष्टी तहसील कार्यालयावर नंदीबैल घेऊन समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी निवेदन नायब तहसिलदार प्रदिप पाडूळे व पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांना देण्यात आले आहे. यावेळी मोर्चात सहभागी युवा नेते जयदत धस, यशवंत खंडागळे, सरपंच राम धुमाळ, अशोक पवार, ताराचंद कानडे,शिवाजी कानडे,नामदेव भिसे बाबासाहेब कानडे,नवीन गोडे,हरी वायकर, उत्तरेश्वर भिसे लखन साळुंखे, रायभान यादव, प्रकाश मंडाळे चंद्रकांत विधाते, गणेश गोडे, चंदू कानडे व काही समाजिक कार्यकर्ते सहभागी होते.
Add new comment