साकत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सदाशिव वराट

जामखेड, (प्रतिनिधी):- तालुक्यातील सर्वांत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या साकत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सदाशिव वराट यांची बिनविरोध निवड झाली आहे.     साकतचे सरपंच पद  इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. पहिले सव्वा वर्ष छाया प्रभाकर वराट या सरपंच होत्या त्यानंतर चंद्रकांत लक्ष्मण वराट हे सव्वा वर्ष सरपंच होते. त्यांनी १ जुन रोजी राजीनामा दिला होता. यामुळे सरपंच पद रिक्त होते. आज सदाशिव वराट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी डॉ. भगवानराव मुरुमकर, हनुमंत पाटील, चंद्रकांत वराट, दत्ता कोल्हे, मनिषा पाटील, सोजरबाई वराट, जालिंदर नेमाने, हरीभाऊ मुरुमकर, दिलीप घोलप, मिना अडसुळ, छाया वराट, ललिता कोल्हे, जिजाबाई कोल्हे हे सर्व सदस्य उपस्थित होते.
     निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोपाळराव मोहळकर तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कामगार तलाठी महेश धुमाळ, ग्रामविकास अधिकारी विश्वासराव तनपुरे यांनी काम पाहिले तर पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
  यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच सदाशिव वराट म्हणाले की, पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर व हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम  करणार आहे. गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. तसेच स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.