लाइव न्यूज़
चिदंबरम यांच्या घरातून हिरे चोरीला
Beed Citizen | Updated: July 8, 2018 - 3:09pm
चेन्नई, (वृत्तसंस्था):- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या तामिळनाडू येथील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून हिरे, सोनं आणि १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबत नुंगमबक्कम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
चिदंबरम यांच्या तामिळनाडूतील नुंगमबक्कम येथील घरी चोरी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या आधी चिदंबरम यांच्या एका नातेवाईकाचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. शिवमूर्ती असं त्याचं नाव आहे. दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणाची डोकेदुखी वाढलेली असतानाच घरातील किंमती ऐवज चोरीला गेल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Add new comment