लाइव न्यूज़
जामखेडच्या वस्तीगृहात सडके अन्न
Beed Citizen | Updated: June 29, 2018 - 3:21pm
जामखेड, (प्रतिनिधी):- येथील मागासवर्गीय वस्तीगृहातील मुलींना सडके अन्न व अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी वस्तीगृहाला भेट देवून मुलींच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविण्यात येणार असल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले.
जामखेड येथील सदाफुले वस्तीच्या परिसरातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहात निकृष्ट अन्न मिळत असल्याची तक्रार तेथीलच मुलींनी तहसिलदारांकडे केली होती. त्यामुळे तहसिलदार नाईकवाडे यांनी भेट देवून तेथील सडके अन्न व इतर बाबींची तपासणी केली. या प्रकरणी कारवाईचे संकेत नाईकवाडे यांनी दिले आहे. दरम्यान धुळे येथील सुनिल ट्रेडर्सला जेवणाचा ठेका दिलेला असुन ते कधीच वस्तीगृहात येत नाहीत. त्यांनी उपठेकेदार नेमलेला असुन तोच सर्व भाज्या आणतो असे वस्तीगृह अधिक्षक करुणा ढवन यांनी सांगितले.
Add new comment