लाइव न्यूज़
तलवाड्याजवळ पोलिसांचे छापे; वाळूचे ट्रॅक्टर पकडले

तलवाडा, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील तलवाड्यापासुन जवळच असलेल्या कटचिंचोली येथील नदीपात्रातून वाळू उपसा सुरु होता. तलवाडा पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता एक ट्रॅक्टर वाळूने भरलेले तर तीन रिकामे आढळले. ही कारवाई आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथे तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि.शेळके, पोलिस कर्मचारी तडवी, बहिरवाळ, राहतावड, खंडागळे आदिंनी गोदावरी नदीपात्रातून उपसा सुरु असतांना छापा टाकला. पोलिसांनी चार ट्रॅक्टर जप्त करुन तहसिल कार्यालयाकडे कारवाईसाठी पाठवले आहे.
Add new comment