लाइव न्यूज़
कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळणार?
Beed Citizen | Updated: June 26, 2018 - 3:07pm
बेंगळुरू, (प्रतिनिधी):-कर्नाटकातील राजकीय संकट अद्याप दूर झालं नाही. सुरुवातीला संख्याबळ, त्यानंतर मंत्रिमंडळ खातेवाटप आणि आता बजेटवरून नवीन वाद निर्माण झाला असून, ५ जुलैला बजेट सादर करण्यापूर्वीच राज्यातील अवघ्या चार आठवड्यांचं एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मंत्री आणि आमदारांच्या तीव्र नाराजीमुळं जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचं सरकार कोंडीत सापडलं आहे. कॉंग्रेसचे नाराज नेते सध्या चर्चेने मार्ग काढण्यास तयार नाहीत. कॉंग्रेसचे बहुतांश नाराज नेते सरकार पाडण्यासाठी भाजपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्यानं कुमारस्वामी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत, असे सांगितले जाते.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे जेडीएस-कॉंग्रेस समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. ते उपचारासाठी सध्या धर्मशाला येथे गेले आहेत. या कालावधीत ते कुणाचेही फोन कॉल घेत नाहीत. पण ते विश्वासू सहकारी एस. टी. सोमशेखर, बी. सुरेश आणि एन मुनिरत्न यांच्या संपर्कात असल्याचंही सांगण्यात येतं. सिद्धरामय्या यांचा अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते नवीन बजेट आणि कुमारस्वामी सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाला समर्थन करत नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले होते.
Add new comment