माजलगावमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल फेरी

माजलगाव, (प्रतिनिधी):- पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वात आज सायकल फेरी काढण्यात आली. स्वत: जयसिंह सोळंके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सायकलवर बसुन तहसिल कार्यालयापर्यंत गेले होते.
माजलगाव येथे आज दुपारी कॉंगे्रस-राष्ट्रवादीसह इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल फेरी काढण्यात आली. गेल्या पंधरा दिवसापासुन पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असुनही भाजप सरकार त्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी स्वत: सायकलवर बसुन तहसिल कार्यालयापर्यंत निषेधफेरी काढली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.