शेतकर्यांच्या रकमेवर लिपीकाचा डल्ला ; जिल्हाधिकार्यांकडून निलंबन
केज, (प्रतिनिधी):- शेतकर्यांसाठी २०१५-१६ करीता देण्यात आलेल्या अनुदान रकमेवरील धनादेशावर खाडाखोड करून अपहार करण्याचा पराक्रम तहसील येथील लिपीकाने केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी निलंबनाची कारवाई केली असून त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. केतन कांबळे असे या लिपीकाचे नाव असून त्याने प्रशासनाकडून आलेल्या धनादेशावर खाडाखोड करून तब्बल ८ लाख ४० हजाराचा अपहार केला होता. कांबळे यांनी शेतकर्यांचे खाते क्रमांक व नावात झालेल्या चुकांची दुरूस्ती करून संबंधित शेतकर्यांना अनुदान वितरणासाठी लेखा विभागाकडे धनादेशाची मागणी नोंदवली होती. मात्र, धनादेश मिळताच त्याने खाडाखोड करून दीड लाख जास्तीचे खर्ची केले होते. त्यानुसार कांबळेंना नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये अपहार झाल्याचे त्याने कबूल केले असून त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
Add new comment