लाइव न्यूज़
भामरागडमध्ये पोलिसांबरोबरील चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा
Beed Citizen | Updated: April 22, 2018 - 3:01pm

गडचिरोली, (प्रतिनिधी):- गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात पोलिसांनी सुमारे १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असून यामध्ये जहाल नक्षलवादी साईनाथ, सिनूचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. भामरागड तालुका हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीनंतर जंगलात कोम्बिंग ऑपरेशन चालू करण्यात आले आहे.
Add new comment