बलात्कार्यांना धडा शिकविण्यासाठी मोर्चात सहभागी व्हा - विजयसिंह पंडित

शुक्रवार दि. 20 रोजी गेवराईत निघणार सर्वधर्मीय मोर्चा
----------------------------------------——————————
माणुसकीला काळीमा फासणार्या घटना देशभरात घडत आहेत, कटुआ आणि उन्नाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. बलात्कार आणि अत्याचाराचा देशभरातुन निषेध होत असतांना काही लोक आरोपींची निर्लज्जपणे पाठराखण करत आहेत, देशातील महिला व विद्यार्थीनींवरील अत्याचार थांबविण्यासाठी आणि बलात्कार्यांना धडा शिकविण्यासाठी नागरीकांनी धर्म, पक्ष आणि संघटना यांचा कोणताही विचार न करता पिडीतेला न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
कटुआ आणि उन्नाव येथे चिमुकल्या मुलींवर झालेला अत्याचार आणि क्रुर खुनाच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरलेली आहे. ठिक-ठिकाणी नागरीक या घटनेचा तिव्र निषेध करत आहेत. गेवराई येथे सर्वधर्मीय आणि सर्व पक्षीय संघटनांनी शुक्रवार दि. 20 रोजी दुपारी 3 वाजता जि.प.कन्या शाळा,गेवराई येथुन मुक मोर्चा काढण्याचे नियोजन केलेले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन माणुसकीला काळीमा फासणार्या घटनेचा निषेध करण्याचे जाहिर आवाहन केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेन नाटकर, जालिंदर पिसाळ, युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, शहराध्यक्ष गुफरान इनामदार, समाधान मस्के, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष खालेद कुरेशी, शहराध्यक्ष नविद मशायक, कामगार सेलचे शहराध्यक्ष शेख मन्सुर, नगरसेवक शाम येवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कटुआ येथे आसिफावर झालेले अत्याचार दडपण्यासाठी सत्ताधारी मंत्री या घटनेचे निर्लज्जपणे समर्थन करत आहेत तर उन्नाव येथील बलत्कार प्रकरणात भाजपा आमदाराचे नाव उघड झालेले आहे. या घटनेमुळे देशभरात सत्ताधार्यांच्या विरोधात जनप्रक्षोभ निर्माण झालेला आहे. कटुआ आणि उन्नाव प्रकरणातील आरोपींना कडक शासन करुन पुन्हा अशा प्रकारच्या घटना देशात घडु नयेत यासाठी मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने होणार्या या निषेध मोर्चात गेवराई तालुक्यातील नागरीकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले आहे. #JusticeforAsifa
Add new comment