लाइव न्यूज़
मांजरातून पाणी सोडल्याने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी आक्रमक

केज, (प्रतिनिधी):- येथील मांजरा धरणातुन पाणी सोडल्याने आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांसह शेतकर्यांनी धरणस्थळी घोषणाबाजी करत पाणी न सोडण्याची मागणी केली. यावरुन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
केज तालुक्यातील मांजरा धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक असतांना दोन दरवाजातून सदरील पाणी सोडण्यात येत होते. याप्रश्नी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांनी प्रशासनाला पाणी न सोडण्याची मागणी केली होती. आज दुपारी कार्यकर्त्यांसह शेतकर्यांनी धरण परिसरात जाऊन घोषणाबाजी केली. गेटमधुन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागणीला यश आले असुन आज दुपारनंतर पाणी बंद करण्यात येणार आहे. यावेळी प्रताप सोमवंशी, रवि इंगळे, अशोक दांड, हर्षवर्धन खोडसे आदिंची उपस्थिती होती.
Add new comment