लाइव न्यूज़
गेवराईत शांतता कमिटीची बैठक
गेवराई, (प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त आज गेवराई पोलीस ठाण्याच्या वतीने येथील महात्मा फुले शॉपिंग सेंटर (तापडिया हॉल) येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले,तहसीलदार संजय पवार,माजी मंत्री बदामराव पंडित,पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बब्बूभाई बारुदवाले यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की गेवराईकरांचे आजपर्यंतचे विविध उत्सव व कार्यक्रम हे शांततेच्या मार्गाने व आदर्श उपक्रम असतात यात पोलिसांनाही आपली साथ असते त्याप्रमाणेच या वर्षीच्या हा जयंती उत्सव शांततेत पार पाडा असे सांगितले.यावेळी तहसीलदार संजय पवार,माजी मंत्री बदामराव पंडित,डॉ.अर्जुन भोसले यांनी उपस्थितांना हा उत्सव शांततेत पाडण्यात आशा सूचना देत शुभेच्छा दिल्या.
Add new comment