लाइव न्यूज़
उन्हाची तिव्रता वाढताच आगीच्या घटना घडू लागल्या केजमध्ये घराला आग ; लाखोंचे नुकसान

केज ( प्रतिनिधी ) शहरातील आझाद नगर भागातील शेख मजीद शेख रसुल यांच्या घराला रात्री आग लागल्याने घरातील महत्वाचे कागद पत्रासह रोख रक्कम व दागिने असे दिड लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान उन्हाची तीव्रता वाढताच आगीच्या घटना घडू लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच माजलगाव जवळ जिनिंगला आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते .
केज येथील शेख मजीद रसुल हे बांधकाम मिस्त्री असुन कुटुंबातील सात सदस्यांसोबत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत. काल रात्री लाईट गेल्याने घरात दिवा लाऊन पाहुण्याकडे जेवायला गेले होते. यादरम्यान घराला आग लागून मोठे नुकसान झाले. यावेळी केज नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष दलिलभाई इनामदार यांनी तात्काळ घराची पाहणी करून पीढीतांना पाच हजार रुपयांची मदत केली. सकाळी 11 वाजता तहसील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान आठवड्यात जिल्ह्यात आगीच्या दोन घटना घडल्या असून उन्हाची तीव्रता वाढताच आगीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Add new comment