लाइव न्यूज़
दहावीची परिक्षा देणार्या विद्यार्थीनीची हत्या करून युवकाची आत्महत्या

अल्पवयीन प्रियसीचा खुन करुन प्रियकरानेही घेतला गळफास
केज,(प्रतिनिधी):- दहावीची परिक्षा देत असलेल्या विद्यार्थीनीची गळा आवळून हत्या केल्यानंतर युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ढाकेफळ (ता.केज) येथे घडली आहे. सदरील प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केज तालुक्यातील ढाकेफळ येथील सुनिता दिगंबर चटप (वय १६) ही सध्या दहावीची परिक्षा देत होती. काल दुपारी गणेश रामधन थोरात (वय २५) याने सुनिताच्या वडिलांकडे तिच्यासोबत लग्न करण्यासंदर्भात मागणी केल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी नकार दिला होता. काही दिवसांपुर्वीच सुनिताला लग्नासाठी स्थळ आल्याचे गणेशच्या कानावर आले होते. तेंव्हापासून तो अस्वस्थ होता. शुक्रवारी रात्री गणेशच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास सुनिताचे आई-वडिल आले होते. त्यामुळे सुनिता आणि तिचा अपंग भाऊ दोघे एकटेच घरात होते. ही संधी साधून रात्री ११.३० च्या सुमारास गणेश सुनिताच्या घरी गेला. तिला बळजबरीने जवळ असलेल्या शेतात घेवून गेला. त्याठिकाणी तिचा गळा आवळून खून केला. व स्वत: देखील जवळच्याच बोरीच्या झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्याने काही जणांना फोन करून घटनेबाबत कळविल्याची चर्चा आहे. दरम्यान सदरील घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली असून मयत गणेश थोरात याच्या भावाने व बहिणीनेही यापुर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.
Add new comment