लाइव न्यूज़
जवळबन सोसायटीचे चेअरमन सुभाष करपे यांची आत्महत्या
Beed Citizen | Updated: March 10, 2018 - 3:01pm
केज, (प्रतिनिधी):- जवळबन सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुभाष करपे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. करपे यांनी शुक्रवारी विष प्राशन केल्यानंतर आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सोसायटीच्या आगामी निवडणुकीसाठी त्यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातून झालेल्या वादानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर करपे यांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली.
केज तालुक्यातील जवळबन सोसायटीचे चेअरमन सुभाष ज्ञानेश्वर करपे (४५) यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गावाजवळील बाग नामक शेतात विष प्राशन केले होते. अत्यावस्थ अवस्थेत त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. सुभाष करपे यांनी सोसायटीच्या आगामी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना काहीनीं धमक्याही दिल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.
Add new comment