युसुफवडगाव येथे नवविवाहितेची आत्महत्या

सुफवडगाव, (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे ९ महिन्यापूर्वी विवाह झालेल्या एका विवाहितेने विषारी प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तनुजा शिवप्रसाद कोरसळे (वय १९) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. येथील शिवप्रसाद कोरसळे याच्यासोबत तिचा ९ महिन्यापूर्वी विवाहझाला होता. शुक्रवारी पहाटे तिने सासरी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. सासरकडील लोकांनी तिला अत्यवस्थ अवस्थेत अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सायंकाळनंतर तनुजाची प्रकृती अधिक खालावली आणि रात्री १०.१५ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. युसुफ वडगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. एकाच दिवसातील या तन्ही घटनांनी केज तालुका हादरून गेला आहे. अद्याप एकही घटनेची पोलिसात नोंद झाली नसून शवविच्छेदना नंतर तिन्ही घटनातील गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याचे समजते. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.