लग्नाआधी नववधूने दिला गणिताचा पेपर

अजय बाेराडे-प्रतिनिधी-सिल्लोड
-------------------------------------------
तालुक्यतील तळणी येथे सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात बारावी परीक्षेचे केंद्र असून या ठिकाणी परिसरातील विध्यार्थी काही दिवसांपासून परीक्षा देत आहेत दि 03-03-2018 शनिवार रोजी विज्ञान शाखेचा गणिताचा पेपर होता येथून जवळच असलेल्या सिल्लोड तालुक्यातील बोजगाव येथील विध्यार्थीनी माया सुधाकर शेलार या विध्यार्थ्यांनीचा सुध्दा पेपर होता मात्र तिचा याच दिवशी भोकरदन तालुक्यतील तळणी येथील या मुलाशी 1 वाजता विवाह संपन्न होणार होता मात्र परीक्षेची वेळ 11 ते 2 होती मायाला हळद लागलेली होती मात्र माया मध्ये असणारी शिक्षणाची आवड लपून राहिली नाही नववधूने 10 वाजता परीक्षा केंद्र गाठले आणि अगोदर गणिताचा पेपर सोडविला परीक्षा संपल्यानंतर बोजगाव येथे सर्व गावकरी नातेवाईक यांच्या उपस्थिती मध्ये 3 वाजता विवाह संपन्न झाला बोजगाव येथील सुधाकर पाटील शेलार यांची ती कन्या होती
Add new comment