औरंगाबाद येथील इजतेमसाठी उर्दू शाळांना एक दिवसाची विशेष सुट्टी जाहीर परीक्षांमध्ये बाधा येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना
बीड ( प्रतिनिधी ) औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबेजळगाव येथे होत असलेल्या राज्य इजतेमसाठी शासनाने दि. 26 फेब्रुवारी रोजी विषेश सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षक आणि मोठ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी होणाऱ्या दुवामध्ये सहभागी होता यावे यासाठी मूफ़टा उर्दू शिक्षक संघटनेने यासंदर्भात शासनाकडे मागणी केली होती. त्यास यश आले आहे.
महाराष्ट्र इजतेमा औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबेजळगाव ( ता. गंगापूर ) येथे उद्या शनिवार दि.24 फेब्रुवारी पासून तीन दिवसीय इजतेमा सुरू होत आहे. दि.24 , 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इजतेमासाठी राज्य भरातून लाखो समाज बांधव येणार आहेत. सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सामूहिक दुवा ( प्रार्थना ) असल्याने सर्वांना सहभागी होता यावे म्हणून मुफटा उर्दू शिक्षक संघटनेने शासनाकडे शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली होती. त्यास यश आले असून शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी आज परिपत्रक काढून धार्मिक संमेलनासाठी एक दिवसीय विशेष सुट्टी जाहीर करावी असे निर्देश शिक्षण आयुक्त , शिक्षण संचालक प्राथमिक , माध्यमिक यांना दिले आहेत. तसेच उर्दू माध्यमांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालये ) शाळांना संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना विशेष सुट्टी जाहीर करण्याच्या अधिकारानुसार सुट्टी जाहीर करण्याबाबतचा निर्णय संबधित मुख्याध्यापक यांनी घ्यावा आशा सूचना देत दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये बाधा येऊ नये याची काळजी घेण्याबाबत निर्देशित केले आहे.
Add new comment