अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी कृती समितीचे जनआंदोलन अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरवात सेलूअंबा ग्रामस्थांनी केले धरणे आंदोलन;आंदोलनाचा पहिला दिवस

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाईकरांच्या अस्मितेचा बनलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीच्या मागणीसाठी अंबाजोगाईकरांच्या वतीने जनआंदोलनाचा उठाव करण्यात आला असून दिनांक 21फेब्रुवारी पासून राज्य सरकारचे या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी जिल्हा कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर सूरु केले आहे. आजच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सेलूअंबा येथील ग्रामस्थांनी जिल्हा निर्मितीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होऊन धरणे आंदोलन केले.
अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईरांनी वेळोवेळी आंदोलनेही केली. परंतु जिल्हा निर्मीतीचा प्रश्न काही मार्गी लागला नाही. जिल्हा निर्मितीच्यासाठी आवश्यक असणारी बहुतांश कार्यालये अंबाजोगाई शहरात आहेत. राज्य सरकार राज्यातील काही मोठ्या जिल्ह्य़ाच्या विभाजनाचा विचार करीत आहे. त्यात बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा घोषित करावा अशी मागणी अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात येत आहे. राज्य विधानसभेचे अधिवेशन 26 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने जिल्हा निर्मीतीची मागणी पूर्ण करून अंबाजोगाई जिल्हा घोषित करावा यासाठी जिल्हा कृती समितीच्या वतीने जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाची कृती समितीने नियोजनबद्ध अशी दिशा ठरविली असून त्याचाच एक भाग म्हणून आज उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आजच्या पहिल्या दिवशीच्या आंदोलनात सेलूअंबा गावच्या ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,बीड जिल्ह्य़ाचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाचे धोरण छोटे जिल्हे निर्माण करणे बाबतीत झाले असून शहरात जिल्हा स्तरावरील सर्व कार्यालये निर्माण झाले आहेत. तेव्हा सदर मागणीची तीव्रता लक्षात घेता तात्काळ अंबाजोगाई जिल्हा घोषित करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. त्यासोबतच सेलूअंबा ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनेही अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीचा ठराव घेण्यात आला आहे. जिल्हा निर्मितीच्या धरणे आंदोलनात राजाभाऊ औताडे, भाऊसाहेब औताडे,अभिमन्यू औताडे, अनिल देशमुख धोंडीराम तुकाराम गरड, चैतराम भिमराव औताडे, संतोष चैतराम औताडे, कल्याण ज्ञानोबा देशमुख, धनराज नानासाहेब गांजवर, केशव दस्तगीर गिरी, राजाभाऊ सुभाषराव देशमुख, मंगेश बालासाहेब देशमुख, सुनील शिवाजीराव देशमुख, बबन रामकिशन देशमुख,रामराव यादव वाघमारे, नितीन चौधरी,सिद्राम यादव यांच्यासह असंख्य ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा कृती समितीचेही कार्यकर्ते उपस्थित होते. अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीसाठी अंबाजोगाईकरांनी या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे..

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.