लाइव न्यूज़
महाराष्ट्र इज्तेमा तयारी अंतिम टप्प्यात सर्व कायदेशीर बाबी पुर्ण; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे इज्तेमा कमेटीचे आवाहन
Beed Citizen | Updated: February 17, 2018 - 3:02pm
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचा राज्य इज्तेमा औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे होत आहे. गेल्या सहा महिन्यापासून इज्तेमाची सुरू असलेली तयारी अंतीम टप्प्यात आहे. दि.२४, २५, २६ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या इज्तेमास राज्यभरातील मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. इज्तेमाशी संबंधीत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाले असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन औरंगाबाद इज्तेमा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे राज्यातील मुस्लिम बांधवांचा इज्तेमा (मेळावा) होत आहे. इज्तेमाची तयारी अंतीम टप्प्यात असून गेल्या सहा महिन्यात राज्यभरातील स्वयंसेवकांनी त्याठिकाणी जावून श्रमदान केले आहे. दि.२४, २५, २६ रोजी होत असलेल्या इज्तेमासाठी राज्यभरातील लाखो समाजबांधव उपस्थित राहणार असल्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहे. भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी त्या-त्या जिल्ह्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा अडथळा येवू नये म्हणून प्रत्येक वाहनांसाठी पार्किंग नंबर स्टिकर देण्यात येत आहे. वाहनांच्या पार्किंग नंबरमध्ये एक पासून बावीस क्रमांकांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याला वेगळे क्रमांक दिले असून त्या क्रमांकानुसारच त्या-त्याठिकाणी पार्किंग करण्यात येणार आहे. इज्तेमासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या असून राज्यातील समाजाबांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन औरंगाबाद इज्तेमा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या सोशल मिडीयाचे युग असून त्याद्वारे पसरवणार्या अफवांपासून सर्वांनी सावध रहावे आणि राज्य इज्तेमा यशस्वी करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
Add new comment