लाइव न्यूज़
वीज कंपनीच्या कार्यालयातच ग्राहकाने घेतले विष
Beed Citizen | Updated: February 17, 2018 - 2:49pm
लाईनमन निर्मळ यांच्याकडे मिटरसाठी पैसे भरूनही कनेक्शन तोडल्याचा आरोप
बीड (प्रतिनिधी) विज मीटर कनेक्शनसाठी लाईनमन निर्मळ यांच्याकडे पैसे भरूनही त्यांनी दोन दिवसापूर्वी दिलेले मीटर काढून घेत कनेक्शन तोडल्याचा आरोप करत एका ग्राहकाने आज सकाळी विष प्राशन केले. बार्शी नाका येथील विज कंपनीच्या कार्यालयातच हा प्रकार घडला असून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या ग्राहकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बीड शहरातील अचानक नगर भागातील शेख अनिस शेख अब्दुल उर्फ टेलर (५०) यांनी विज कनेक्शनसाठी लाईनमन निर्मळ यांच्याकडे तीन हजार रूपये भरले होते. त्यानुसार निर्मळ यांनी शेख अनिस यांना विज कनेक्शन देवून मीटर बसवले होते. मात्र दोन दिवसापूर्वी निर्मळ यांनी कर्मचार्यांसह येवून कनेक्शन तोडले असा आरोप करत शेख अनिस शेख अब्दुल यांनी बार्शी नाका येथील विज कंपनीच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने खळबळ उडाली असून यापुर्वीही बार्शी नाका येथील कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न झालेला आहे. बार्शी नाका येथील विज कंपनी कार्यालयातील कर्मचार्यांच्या विरोधात वारंवार तक्रारी वाढत असूनही वरिष्ठ अधिकारी याकडे बघ्याची भुमिका घेत असल्यानेच असे प्रकार वाढत असल्याचे बोलले जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लाईनमन असूनही अभियंत्यासारखा रूबाब!
बार्शी नाका येथील विज वितरण कंपनी अंतर्गत कर्मचार्यांविषयी तक्रारी वाढत आहेत. यापूर्वीही एका तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज शेख अनिस शेख अब्दुल उर्फ टेलर यांनी लाईनमन निर्मळ याच्याविरूध्द आरोप करत विष प्राशन केले. निर्मळ हे त्याठिकाणी लाईनमन असूनही त्यांचा रूबाब मात्र अभियंत्यासारखा असतो अशी चर्चा होत आहे. यासर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी बार्शीनाका भागातील नागरीकांकडून होत आहे.
Add new comment