लाइव न्यूज़
गेवराईतील गारपिटग्रस्त भागाची कॉंग्रेस नेत्यांकडून पाहणी
गेवराई, (प्रतिनिधी):- तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या गारपीट ग्रस्त भागाची कॉंग्रेस नेत्यांनी आज दुपारी भेट देवून पाहणी केली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ,विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील , माणिकराव ठाकरे ,खा. राजनीताई पाटील आदींनी शेतकर्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली. दरम्यान कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात आले होते. त्यांनी गापीटग्रस्तांकडे पाठ फिरवली , कसल्याही निधीची घोषणा केली नाही.मात्र माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी थेट शेतकर्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा जाणून घेतल्याने कॉंग्रेसची नाळ आजही सामान्यांशी जुळलेली आहे हे दाखवून दिले.
बीड जिल्ह्यामध्ये चार दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यात शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले. विविध फळबागा उध्वस्त झाल्या, पिके कोलमडली या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बीड जिल्हा दौर्यावर आले होते. नारायणगड येथील विकास कामासाठी २५ कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला मात्र गारपीटग्रस्त शेतकर्यांकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. कसल्याही निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज थेट शेतकर्यांच्या बांधावर जावून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यामुळे कॉंग्रेसची आजही शेतकर्यांशी नाळ जुळलेली असल्याचे दिसून आले.
Add new comment