बोण्डअळी नंतर गारपिटीने खचलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ हेक्टरी 50 हजाराची नुकसान भरपाई द्या -- बदामराव पंडित
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील, दुष्काळाचे चटके सहन केलेल्या शेतकऱयांना कापसावर पडलेल्या बोण्डअळी आणि आता गारपीट झाल्याने आणखीनच आर्थिक खाईत लोटले आहे. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा आणि ऑनलाईनचा घोळ घालून चालणार नाही तर तात्काळ पिकांचे पंचनामे करून गारपीटग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शेतकऱयांसह तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करून ठिय्या मांडला.
गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील विविध भागात दि 11 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. यात शेतकऱयांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, दि 15 फेब्रुवारी रोजी, गेवराई तहसिल समोर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी व शिवसैनिकांनी धरणे आंदोलन करून ठिय्या मांडला. तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, गेवराई मतदारसंघातील चकलांबा, उमापूर, धोंडराई, तालखेड व टाकरवन या सर्कलमधील बहुतांश गावांना गारपिटीचा फटका बसला असून, गहू, ज्वारी, हरभरा, मका, या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या गारपटग्रस्त शेतकऱयांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी नसता शिवसेना यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशाराही बदामराव पंडित यांनी दिला आहे. तालुकाप्रमुख अजय दाभाडे, माजी सभापती पंढरीनाथ लगड यांनीही तालुक्यातील शेतकऱयांची अवस्था सांगून सरकारने केवळ घोषणाबाजी न करता, प्रत्यक्ष काम करून शेतकऱयांना आर्थिक मदत करावी असे म्हटले. आंदोलनात पं स सभापती अभयसिंह पंडित, उपसभापती भीष्मांचार्य दाभाडे, जि. प. सदस्य बाबुराव जाधव, महादेव औटी, बालासाहेब पाणखडे, आजमखान पठाण, प्रवक्ते दिनकर शिंदे, सुभाषराव शिंदे, बंडू आप्पा घोलप, नंदू गाडे, कालिदास नवले, धर्मराज आहेर, महादेव खेत्रे, मधुकर आहेर, गणेश आहेर, आबा उबाळे, संतोष हिंगे, अशोक वंजारे, रामभाऊ येवले, तात्यासाहेब सुळ, भागवत ढेंबरे, शिवाजीराव डोंगरे, बाबुराव डाके, संदीपान पट्टे, बाळासाहेब नागटिळक, शिवाजीराव हिंगे, सुनील दरफे, आनंदे महाराज, विठ्ठल गोरडे, राजेंद्र रोमन, पिकाजी राठोड, ओंकार पवार, विठ्ठल साखरे, भैय्या नाईकवाडे, दीपक रडे, मुजाफर पठाण, सय्यद माजेद, ऍड श्रीनिवास ढाकणे, दादासाहेब संत, शेख नाविदभाई, अतुल खरात, शेख माहेबूब, बाबासाहेब शिंदे, कॅप्टन गिरी, तात्या चाळक, बद्रीनाथ लोणकर, फत्तुभाई, किरण आहेर, खदिर बागवान, शेख सादेक, अशोक मुटके आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Add new comment