लाइव न्यूज़
दागिने उजळून देण्याचे पावडर वापरून पहा म्हणत २१ तोळे सोने लांबवले
Beed Citizen | Updated: February 15, 2018 - 3:37pm
अंबाजोगाईतील भरदिवसा घडलेला प्रकार; सव्वा चार लाखांचे दागिने लुटले
अंबाजोगाई (प्रतिनिधी) घराजवळ आलेल्या अज्ञात दोघांनी दागिने उजळून देण्याचे पावडर वापरून पहा असे म्हणत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील गंठण असे एकूण २१ तोळे सोने लंपास केल्याचा प्रकार शहरातील चौसाळकर कॉलनी काल दुपारी घडला. यावेळी चोरट्यांनी एकूण सव्वा चार लाख रूपयांची दागिने लुटल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहरातील चौसाळकर कॉलनीतील एका घरासमोर आलेल्या अज्ञात दोघांनी तेथील एका महिलेला दागिने उजळून देणारे पावडर दाखवले. त्या पावडरने सोन्याच्या दागिन्यांना झळाळी मिळते असे भासवून महिलेच्या गळ्यातील गंठण, हातातील सोन्याच्या बांगड्या, गोठ काढून द्या आणि पावडर वापरून पहा असे म्हणत २१ तोळे दागिने लंपास केले. या प्रकरणी श्रीमती दिपाली कुलकर्णी (४५) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द ४ लाख २० हजार रूपयांचे दागिने लुटल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि तडसे हे करीत आहेत.
Add new comment