मराठवाडा-विदर्भ पुढचे २ दिवस वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

मुंबई (व्रतसेवा) : मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे चिंतेचे ढग हटलेले नाहीत. पुढचे २ दिवसही वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीनं थैमान घातलं.

यामुळे हरभरा, ज्वारी, गहू, द्राक्षांसह अनेक उभी पिकं भुईसपाट झाली. मात्र, तोंडचा घास हिरावल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यासमोर समस्यांचा डोंगर आ वासून उभा राहिला आहे. लिंबाएवढ्या गारांनी शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं आहे. त्यामुळे पुढचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याला आणखी आटापिटा करावा लागणार आहे.


दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.