श्रीक्षेत्र धोत्रा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा महोत्सव

शिवना : गणेश जाधव
———————————————————————

आजपासून श्री क्षेत्र धोत्रा येथे २१ दिवसांच्या श्री सिद्धेश्वर महाराज भव्य यात्रा महोत्सवास मोठ्या थाटात प्रारंभ होत आहे.यासाठी प्रशासन,यात्रा उत्सव कमिटी,संस्थान,व गावकरी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.पोलीस स्टेशनच्या वतीने याठिकाणी मोठा बंदोबस्त यात्रा व मंदीराच्या ठिकाणी आहे तसेच पिण्याच्या पाण्याचीही मुबलक व्यवस्था श्री संस्थान व प्रशासनाकडून करण्यात आली आहे.वीज वितरण विभागही सज्ज आहे .भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येऊ नये व त्यांचे दर्शन शांततेत पार पडावे यासाठी गावकरी भाविकांकडून दर्शनरांगेची योग्य सोय व नियोजन गर्दीच्या दिवसांमध्ये करण्यात येते हे विशेष.! एसटी महामंडळाकडून जास्तीच्या बसेस सिल्लोड आगारातून सोडण्यात येत आहे.आपत्कालीन परिस्तिथी मध्ये आरोग्य विभागही खबरदारी बाळगून आहे तश्या सूचना तहसील कार्यालया मार्फत सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत.
         श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेमध्ये फिरती सिनेमागृहे हे विशेष आकर्षण आहे या चित्रपट ग्रहांमधून उत्कृष्ट मराठी व हिंदी चित्रपट दाखवली जातात. विविध धार्मिक चित्रपट यात्रेत रंगत आणतात.रहाट पाळणे,ब्रेक डान्स,सर्कस,लहान मुलांची पाण्यातली जहाजे,मिकी माऊसचा फुगा व त्यावरील मारल्या जाणाऱ्या उडया, ट्रेन मध्ये बसून मामाच्या गावाला जाऊया...यासर्व  वातावरणाने यात्रा चांगलीच बहरुन जाते.महाराष्ट्राची लोकधारा जपणारी अनेक नामवंत तमाशा मंडळे आजही या यात्रेत येऊन प्रचंड गर्दीची सर्व विक्रम मोडतांना दिसत आहे. फास्ट फूड च्या जमान्यात आजही सर्वसामान्य जनता डाळ्या-रेवड्यांना प्राधान्य देतांना दिसते.
खेळण्याची दुकाने,कटलरी,कपड्यांची दुकान,पुस्तकांची दुकान,धार्मिक फोटोंची दुकान,किराणा दुकान,हॉटेल्स,पान शॉप,टी शॉप,फळांची दुकान,विविध थंड पेयांची रसवंती गृह,खानावळी,शेती उपयोगी साहित्य विक्री केंद्र, या सर्वच दुकानांची या ठिकाणी प्रचंड गर्दी असते श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन भाविक यात्रे मध्ये विविध वस्तूंची खरेदी करतात .अश्या प्रकारे हि यात्रा आजच्या डिजिटल युगातही तिच्या वेगळे पणा मुळे व श्री सिद्धेश्वर भक्तांचे प्रेमापोटी गगन भरारी घेत आहे.
.....
महाराष्ट्राच्या लाडक्या फेम अलका कुबल , तेजा देवकर यांची यात्रेला आवर्जून उपस्थिती राहती हे विशेष .

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.