लाइव न्यूज़
पोलिस असल्याची बतावणी करत ट्रक अडविला कागदपत्र, पैशांची मागणी करत चालकासह क्लिनरला मारहाण
गेवराई (प्रतिनिधी) मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी ट्रक अडवून चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. चालकाने विरोध करताच त्याच्याकडे पैशाची मागणी करत चालकासह क्लिनरला बेदम मारहाण केल्याची घटना गेवराई शहराजवळील पेट्रोल पंपाजवळ रात्री घडली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून ट्रकला गेवराईच्या पुढे नेवून सोडले. दरम्यान या पुर्वीही असे प्रकार घडलेले असून लुटमार करणार्यांचा कसलाच तपास होत नसल्याने पुन्हा-पुन्हा अशा घटना घडत आहेत.
बेंगलोरहून गेवराई मार्गे औरंगाबादकडे जाणारा ट्रक क्र.(के.ए.०८ ८२३४) हा रात्री शहराजवळील एका पेट्रोल पंपाजवळ आला असता पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तिघाजणांनी ट्रकला अडवलिे. पोलिस असल्याचे सांगत कागदपत्रांची मागणी केली. चालकाने विरोध करताच त्याच्याकडे पैशासाठी आग्रह धरला. मात्र चालकाने पैसे देण्यास नकार देताच तिघांनी चालकासह क्लिनरला बेल्टने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तिघेही फरार झाले असून चालकासह क्लिनरने पोलिस ठाण्यात धाव घेवून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पंचनामा करून ट्रकला बंदोबस्तात गेवराईच्या पुढे नेवून सोडले. या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
Add new comment