शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील घटना
वडवणी (प्रतिनिधी) नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना खळवट लिमगाव (ता.वडवणी) येथे आज पहाटे उघडकीस आली आहे. मयत शेतकर्‍याकडे खाजगी सावकारासह स्थानिक बँकांचे कर्ज होते. त्यातच मुलीचे लग्न कसे करायचे? हा प्रश्‍न त्यांना सतावत होता. त्या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील भागवत लक्ष्मण फरताडे (४२) यांनी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. मयत भागवत फरताडे यांच्याकडे खाजगी सावकारासह अन्य दोन बँकांचे कर्ज होते. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे चिंतेत असणार्‍या भागवत फरताडे यांना मुलीच्या लग्नाचेही चिंता होती. त्याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. भागवत फरताडे यांच्या पश्‍चाात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.