ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत बचतगटांच्या वस्तूंचे जिल्हास्तरिय प्रदर्शन
खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन ; ३९ बचतगटांचा सहभाग
परळी,
- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने परळी येथे महाशिवरात्री निमित्त महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हा स्तरिय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावरचे अशा प्रकारचे प्रदर्शन पहिल्यांदाच होत असून याचे उद्घाटन खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्या ( ता. १३ ) होणार आहे. जिल्हाभरातून सुमारे ३९ बचतगट यात सहभागी होणार आहेत.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शहरातील अरूणोदय मार्केटच्या शेजारील मैदानात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी ११ वा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत.
_इन्टेंसिव्ह कार्यपद्धतीत_
_बीडचा समावेश_
----------------------------
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत डिसेंबर 2015 पासून जिल्हयाचा इंन्टेंसिव्ह कार्यपध्दतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात चार तालुक्यांचा समावेश होता व एप्रिल 2017 पासून सर्व 11 तालुक्याचा इंन्टेंसिव्ह मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आतापर्यंत एकूण 283 गावात गावप्रवेश होवून स्वंयसहाय्यता समूह स्थापन करण्यात आलेले आहेत. या वर्षा अखेर 425 गावांमध्ये गावप्रवेशाचे नियोजन आहे. जेणे करून ग्रामीण महिलांचे संघटन व रोजगार निमीर्ती होवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल. आज अखेर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात एकुण दहा हजारा पेक्षा अधिक स्वंयसहाय्यता समूह कार्यरत आहेत. आतापर्यंत एकूण चार हजार समूहांना खेळते भांडवल व तीन हजार पेक्षा अधिक समूहांना बँक अर्थ सहाय्य मंजुर करण्यात आलेले आहे. चालू आर्थिक वर्षात तीन हजार पाचशे समूहांना खेळते भांडवल, तीन हजार पेक्षा अधिक समूहांना बँके कडून अर्थ सहाय्य व एक हजार तीनशे समूहांना समुदाय गुंतवणूक निधी वितरीत करण्याचे नियोजन आहे. सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत आतापर्यंत 600 पेक्षा जास्त समूहांना व्याज अनुदान वाटप करण्यात आलेले आहे आणि 1100 समूहांना व्याज अनुदान वाटप करण्याचे नियोजन आहे.
या ठिकाणी स्वंयसहाय्यता समूहाव्दारा उत्पादित विविध वस्तू व खादय पदार्थ यांची विक्री व प्रदर्शन असणार आहे. तरी स्वंयसहाय्यता समूहांनी व नागरिकांनी मोठया संख्येने प्रदर्शनास भेट देवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड यांनी केले आहे.
●●●●
Add new comment