मराठवाड़ा विभागातील व विदर्भातील गारपीट झालेल्या गावातील शेतकारी ना नुकसान भरपाई द्या -शेख निजाम ,

बीड तालुक्यासह माजलगांव आणि गेवराई तालुक्याला आज सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानग्रस्त गावांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावीे असे AIMIM च्या वतीने निवेदन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारीना देण्यात आले
जिल्हयात आज सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. पण याचा सर्वाधिक फटका बीड, माजलगांव व गेवराई तालुक्याला बसला. बीड तालुक्यातील वांगी, शिवणी, माजलगांव तालुक्यातील काळेगाव, हिवरा, डुबाथडी, तालखेडचा परिसर, केसापूरी शिवार, गेवराई तालुक्यातील खळेगांव, पौळाची वाडी आदी गावांमध्ये मोठ्या गारांसह पडलेल्या पावसाने गहू, ज्वारी पिकांसह आंबा, डाळिंब आदी फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात
मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतक-यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जालन्यातील वंजार उमरद गावातील येथील 70 वर्षीय नामदेव शिंदे यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. तर वाशिममध्ये महागाव येथे यमुना हुंबाड या महिलेचा दुर्दैवी अंत झाला असून, आणखी एक महिलाजखमी आहे. जालना शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात आज सकाळी आठ वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ पडलेल्या टपोऱ्या गारांमुळे रस्त्यावर, शेतात गारांचा पांढरा खच साचला होता. गारांमुळे जालना तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा पिकांसह जाफराबाद तालुक्यात शेडनेट हाऊसचे नुकसान झाले आहे. अर्ध्या तासांनंतर आकाश पांढरेशुभ्र होऊन ऊन पडले. वातावरणामध्ये सध्या कमालीचा गारवा आहे. तर अमरावतीतल्या अंजनगाव सुर्जी येथे रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गारांसह जोरदार पाऊस बरसला. साधारण संत्र्याच्या आकाराएवढी मोठी गार येथे पाहावयास मिळाली. जवळपास दहा मिनिटे हा गारांचा जोरदार वर्षाव येथे सुरू होता. तालुक्यातील विहीगाव, चिंचोली, सातेगाव, मूर्खादेवी, कापूसतळणी, गावंडगाव, टाकरखेडासह अन्य गावांमध्येही हा गारांचा वर्षाव झाला. यामुळे संत्रा, हरभरा, कापूस व गव्हाच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातही गेल्या दोन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. वाशिमलाही आज गरपिटीचा फटका बसला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले. वाकद परिसरात वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मालेगाव व वाशिमतालुक्यात वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, सेलू, बोरी येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे; तर जिंतूर तालुक्यातील वझुर येथे वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली आहे.*गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानग्रस्त गावांना लवकरात लवकर नुकसान देण्यात यावीे. असे आव्हान एम आय एम चे बीड आणि औरंगाबाद चे जिल्हा अध्य्क्ष शेख निजाम, व अज्जु भाई

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.