गारपीट नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करावेत आ. विनायकमेटे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
बीड :(प्रतिनिधी) शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांनी जिल्हाधिकारी श्री. एम.डी. सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेवुन गारपिटग्रस्त भागाती नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे तातडीने करुन नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली आहे.
रविवार रोजी मराठवाडयात आवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसला आहे. बीड जिल्हयात सर्वाधिक फटका बसला असुन या मध्ये बीड, गेवराई, माजलगाव, शिरूर का. या तालुक्यात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. लिंबाच्या आकाराच्या गारा बरसल्यामुळे अनेक गावातील पिकांचे होत्यांचे नव्हते झाले. शेतामधील उभे पिक गहु, हरभरा, ज्वारी तर पपई, मोसंबी, आंबा या सारख्या फळपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अवघ्या काही तासातच गारांच्या फटकयामुळे रब्बी पिके आणि फळबागा उध्दवस्त झाल्या आहेत. गहु, ज्वारी आणि हरभरा काही शेतकर्यांच्या दिवसात पदरात पडणार्यां पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Add new comment