न.प.प्रशासनात राहिली नाही शिस्त, ट्रॅफिक झाली बेशिस्त
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी असले ली जुनी पाईप लाईनवर सिमेंट, कळु, राखेचे ट्रक गेल्यामुळे पन्नास वर्षापुर्वी टाकलेली पाईप लाईन दुरूस्तीच्या नावाखाली खड्डे खोदुन आठ दिवस झाले तरी खड्डा न बुजवल्याने शाळकरी मुले, मुली, तसेच दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला असला तरी न.प.प्रशासनास ट्रॅकीक बेशिस्त झाली आहे.
शहरातील बस स्टॅन्ड ते भगवानबाबा चौक दरम्यान रस्त्यावर जड हलकी तसेच दुचाकी, ऍक्टो आदिची प्रचंड वाहतुक असते याच रस्त्यावर योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालय आहे त्या मुळे दिवसभर विद्यार्थ्यांची रेचलेल असते शुक्रवारचा भाजीपाल्याचा बाजार याच रस्त्यावर भरतो एवढ्यज्ञा प्रचंड रहदारी अस भल्या मुख्य रस्त्यालगत जमिनीत अंबाजेागाई नगर परिषेदेने पाणी पुरवठा करण्यासाठी भगवान बाबा चौक ते अण्णाभाऊ साठे चौक परळीस वेस पर्यंत पन्नास वर्षापुर्वीची सिमेंट ची पाईप लाईन तब्बल पंधरा फुट खोल आहे साठे चौकात अनेक सिमेंट विक्रीचे दुकाने आहेत सिमेेंट गोव्या घेवून दहा टायरच्या ट्रक आला की वजनामुळे पाईपलाईनवर दबाव आल्यामुळे फुटले हा प्रकार गेली अनेक वर्षापासुन होत आहे. दुरूस्तीच्या नावाखाली न.प. प्रशासन... नव्हे करोडो रूपये खर्च करते मात्र तेवढया निधीतून नविन लोखंडी पाईपलाईन असती तर ही वेळ आली नसती.
साठे चौक ते योगेश्वरी शाळे दरम्यान गेली आठ-दहा दिवसा पासुन न.प. पाणी पुरवठा विभागाने पाईपलाईन दुरूस्तीच्या नावाखाली मुख्य रस्त्यावर तब्बल पंधरा फुट खोलीचा मोठा खड्डा खोदुन ठेवल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे त्या पेक्षा या खड्याभोवती कुठलीही सुरक्षिततेसाठी अडथळा केला नसल्याने दुचाकीस्वार अथवा शाळकरी मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी मुख्याधिकारी व पाणी पुरवठा सभापती बबनराव लोमटे
यांच्या कडे तक्रारी केल्या संदर्भात पाणी पुरवठा सभापती बबन लोमटे यांना मुख्य रस्त्यावरील लिकेजच्या खड्डयामुळे वाहतुकीस आडथळा तसेच विद्यार्थी अथवा दुचाकीस्वार या खड्डयात पडण्याची शक्यता यावर उपाययोजना संदर्भात विचारणा केली असता लोमटे म्हणाले की ही पाईप लाईन १९६२ साली झाली आहे ती पाईपलाईन कुचकामी झाली असल्याने लिकेजचे प्रमाण वाढले आहे. येत्या सर्वसाधारण सभेत भगवान बाबा चौक ते परळी वेस पर्यंत ची सिमेंटच्या पाईपलाईन ऐवजी लोखंडी पाईप लाईन ती पाईपलाईन मात्र रस्त्याच्या कडेला घेण्यात येईल जेणे करून जड वाहनामुळे पाईपलाईन दबुन फुटणार नाही याच रस्त्याच्या कडेने असणार्या शिक्षण संस्थेचे संरक्षक भिंत बांधली त्या संरक्षक भिंती च्या पायात ही पाईप लाईन असल्याने संरक्षक भिंत पाडावी लागणार आहे दुचाकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याने खर्च वाया जाणार आहे.
खड्डा तात्काळ बुजवून घेवू लोमटे
साठे चौक ते भगवानबाबा चौकापर्यंत प्रचंड वाहतुक असते शाळकरी मुले सायकलीवर जाताना लिकेज बंद होत नव्हते म्हणून खड्डा उघडा ठेवला होता खडयामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो याची जाणीव आहे आम्हाला तातडीने खड्डा बुजवून घेवू - बबन लोमटे (सभापती न.प)
दुरूस्तीनंतर दोन वेळा लिकेज
सिमेंटच्या पाईप लाईनला लोखंडी पाईपने दुरूस्ती केल्यामुळे लिकेज बंद व्हायला उशीर लागतो दोन वेळा पुन्हा खड्डा खोदुन लिकेज दुरूस्त करावे लागले आता दुरूस्त झाले आहे.
- श्री.गोस्वामी सुपरवायझर पाणीपुरवठा विभाग
सीओ, अभियंता नॉटरीचेबल
रस्त्यावरी खड्डयामुळे ट्रॅफकीक जाम झाली नागरिक वैतागले त्यांनी न.प.चे मुख्याधिकारी व अभियंता काळे यांना फोन लावला असता दोघांचेही फोन नॉट रिचेबल सांगत होते.
Add new comment