लाइव न्यूज़
संकटात स्वत:ला एकटे समजू नका, आम्ही तुमच्यासोबत खा.प्रितमताईंनी दिला गारपीटग्रस्तांना दिलासा; गेवराई तालुक्यात केली पाहणी
बीड (प्रतिनिधी) रविवारी सकाळी गेवराई तालुक्यातील अनेक गावात गारपीठीचा तडाखा बसला. या गावांची पाहणी करण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे या सोमवारी सकाळी गेवराई तालुक्यातील खळेगांव, माटेगांव आदि गावांना भेट देण्यासाठी गेल्या असता पाहणी करून त्यांनी गावाकर्यांना आणि शेतकर्यांना दिलासा दिला. नैसर्गिक संकट सांगून येत नाही पण कितीही संकट आले तरी स्वतःला एकटे कधीच समजू नका. पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, प्रशासन आणि आम्ही सर्वजन सदैव तुमच्या सोबत आहोत असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.
रविवारी सकाळी अचानक बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील काही गांवाना गारपीठीचा फटका बसला. सुदैवाने यात कोणतेही जिवीतहानी झाली नाही. मात्र शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. काही घराचंी पडझडही झाली. हे वृत्त समजताच खा.डॉ.प्रिमताई मुंडे तात्काळ सकाळी सकाळी गेवराई तालुक्यातील गारपीठग्रस्त गावांना भेटी देण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी खळेगांव, माटेगांव आदिं गावांना भेटी दिल्या. आज दुपारी आम्ही देखील जिल्हयाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे. शेतकर्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ.लक्ष्मण पवार, विजय गोल्हार, समाज कल्याण सभापती संतोष हंगे, तालुकध्यक्ष प्रकाश सुरवसे, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, उपनराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, प्रमोद पुसरेकर आदि उपस्थित होते.
आज चहा पिणार नाही
तुमच्याकडे एखादया विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी, लोकार्पण करण्यासाठी मला यायचे होते पण दुर्देवाने आज आपतकलीन परस्थितीत मला यावे लागले आहे. आपण माझ्यासाठी चहा केला आहे पण मी आज चहा पिणार नाही ज्यावेळी माझ्या शेतकर्यांच्या मालाला भाव मिळेल, पीक जळणार नाही, तर पीक चांगले ज्यावेळी पीकेल आणि तुमच्या चेहर्यावर मला समाधन दिसेल, तुमच्या गावात एखादया विकासात्मक कामांचा शुभारंभ करील त्या दिवशी मी आपला चहा नक्की पिणार आहे. आज तुमच्या दःुखात मी सहभागी आहे. मी आज तुमचा चहा पिणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
Add new comment