लाइव न्यूज़
शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार, निराधारांच्या प्रश्नावर आंदोलन करणार-दिलीप भोसले, बरकत पठाण
बीड (प्रतिनिधी) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करावी तसेच त्यांना बेबाकी प्रमाणपत्र वितरीत करावे, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पोलिस भरती आणि तलाठी भरतीच्या जागा वाढवून द्यावा, विविध महामंडळासहीत मुद्रा योजनेच्या कर्जाचे वाटप राष्ट्रीयकृत बँकेमार्फत तात्काळ करावे यासह विविध मागण्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार आणि निराधारांच्या प्रश्नी सरकार योग्य ते पाऊले उचलत नसल्याने सर्वांवर संकटाची वेळ आली आहे. सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाकचेरीवर आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी शासनाने नौकरभरती करावी, आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण करून भिमसृष्टीचे काम तात्काळ सुरू करावे, गारपीटग्रस्त शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी, जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन मशिन आणि सोनोग्राफी मशिन सुरू करावी, बीड शहर आणि तालुक्याचा रखडलेला राशन कार्डचा प्रश्न मार्गी लावावा तसेच बीड तालुक्यातील संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील सात हजार प्रलंबीत प्रकरणांची मंजूरी बैठकीचा दिनांक तात्काळ जाहिर करावा यासह विविध मागण्यासंदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे. वरिल मागण्या आठ दिवसाच्या आत मार्गी न लावल्यास जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलीप भोसले, बरकत पठाण यांनी दिला आहे.
Add new comment