लाइव न्यूज़
विविध मागण्यासंदर्भात बसपा, डिपीआय, लोजपाचे जिल्हाकचेरीसमोर आंदोलन
बीड (प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टीच्यावतीने निवडणूकांमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा यासह विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. डिपीआयच्यावतीने केज तालुक्यातील नांदूरघाट येथे एका दलित युवकाला बेदम मारहाण केली होती. यात आरोपीविरूध्द ऍट्रासिटी गुन्हा दाखल झालेला असतांनाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. आरोपीला अटक करा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे तर लोजपाच्यावतीने भिमा कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसाठी एक दिवसीय आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बसपाने निवडणूकांमध्ये ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा. अशी मागणी केली आहे. तसेच भिमा कोरेगाव येथील हल्ल्याचे सुत्रधार संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांना ३०२ कलामाअंतर्गत अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी केली आहे. डिपीआयने केज तालुक्यातील दलित तरूणाला प्रश्न विचारल्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी मोकाट असून त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली आहे. लोजपने भिडे आणि एकबोटे यांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करून आरोपींना तात्काळ अटक करा आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या या मागणीसाठी एक दिवसीय आंदोलन सुरू केले आहे. बसपाच्या आंदोलनात संजय मिसाळ, पंकज कांबळे, प्रशांत वीर, कुमार फुलवरे, रजनीकांत वाघमारे, सतिष गव्हारे यांची उपस्थिती आहे. डेमोक्रेटीक पार्टीच्या वतीने अजिंक्य चांदणे, सुभाष लोणके, बाळासाहेब पौळ, सुधाकर धुरंधरे, भाऊ कावडे, मुकूंद धुताडमल, हनुमान क्षीरसागर यांची उपस्थिती आहे. तर लोकजन शक्ती पार्टीच्या आंदोलनामध्ये राजेश वाव्हुळे, बिभिषण सिरसट, यांच्यासह शिवाजी झोडगे, प्रविण गायसमुद्रे, गोरख झेड, राणोजी डोंगरे, चाऊस सुलेमान यांची उपस्थिती आहे.
Add new comment