दरोडेखोरांचे साम्राज्य !धोंडराईतील शेतवस्त्यांवर दरोडेखोरांची लुटमार महिलेसह तिघे गंभीर जखमी; हजारोंची लुट
दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक; तीन पोलीस जखमी
आष्टी : तालुक्यातील कानडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांनी एका कुख्यात दरोडेखोरास ताब्यात घेतले असून इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
आष्टी तालुक्यातील कानडी शिवारातील बंधाऱ्याच्या बाजूस नदीपात्राजवळ आटल्या ईश्वर भोसले, सचिन ईश्वर भोसले, सोन्या व त्यांच्यासोबत इतर काहीजण मोटारसायकलवरून दरोड्याच्या तयारीने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना काल रविवारी रात्री मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद, उपनिरीक्षक मुबारक शेख, पोलीस कर्मचारी गायकवाड, शिकेतोड, लोहार, दराडे, पिंपळे, पठाण, गुजर, काळे, गडकर, केदार, क्षीरसागर, शेख, कळसाने असे १५ जणांच्या पथकाने तत्काळ कानडी शिवाराकडे धाव घेत दोन वेगवेगळी पथके करून सापळा लावला. रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास दोन मोटारसायकल काही अज्ञात लोक हेडलाईट चालू बंद करत कानडी शिवाराकडे येत असल्याचे दिसून आले. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली असता मोटारसायकल चालकाने पोलीस कर्मचारी लोहार, पठाण आणि शिकेतोड यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, यात पठाण आणि शिकेतोड हे कर्मचारी जखमी झाले. यावेळी गुजर आणि कळसाने यांनी दुचाकीवरील एकास पकडले तर दुसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. दुसऱ्या मोटारसायकलचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली आणि दुचाकीस्वार दोघे दरोडेखोर पळून गेले. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी पिंपळे जखमी झाले.
दरम्यान, सचिन ईश्वर भोसले (रा. वाहीरा) असे पकडण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव असून तो औरंगाबाद ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण मधील अनेक गुन्ह्यात ‘वांटेड’ आहे. त्याच्याकडून एक चॉपर आणि मोटारसायकल (एमएच १६ बीएक्स ४७८७) जप्त करण्यात आली आहे. तर, जाण्यात यशस्वी ठरलेल्या दरोदेखोरात आटल्या ईश्वर भोसले, ईश्वर भोसले आणि अन्य एकाचा समावेश आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर आष्टी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Add new comment