केजच्या बसस्थानकाचा शुभारंभ आजच होणार - हनुमंत भोसले
केज (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे वाहनतळ असणारे केजचे बसस्थानक इमारत व वाहनतळाचे मुख्य काम पूर्ण झाले असून रविवारी सायंकाळी शहरातील विविध शाळांच्या तिनशेहुन अधिक मूली व महिला बसस्थानक वाहनतळावर अभूतपूर्व रांगोळी प्रदर्शनात सहभागी होणार होते मात्र श्रेय लाटण्याठी काही स्थांनकी नेत्यांनी प्रशासणावर दबाव टाकून पोलीस प्रशासनाने रांगोळी काडण्यास विरोध केला. मात्र बस्थानकाचे उदघाटन केजच्या कन्या शाळेतील मुलीच्याच हस्ते करणार असल्याची माहीती संघर्ष समीतीने दीली. मुलींच्या उपस्थितीत सोमवार दि 12 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक सहा वाजता मुलींच्या हस्ते या बसस्थानकात बसगाड्यानां प्रवेश देण्यात येणार होते. केज शहर बसस्थानक बीड जिल्ह्यातील सर्वात जुन्या सात तालुका बसस्थानकापैकी एक आहे. आता नव्याने राज्याचे दोन महामार्ग केज शहरातून जात असल्याने हे बसस्थानक राज्यातील मध्यवर्ती व अनेक शहरानां जोडणारे महत्वाचे बसस्थानक बनले आहे. गेली अडीच वर्षापूर्वी राज्यसभेच्या खासदार सौ रजनीताई पाटील यांच्या द्वारे एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र त्यानंतर एक वर्षानंतर ही बसस्थानकाचे बांधकाम अत्यंत संथगतीने व निकृष्ट होत असल्याचे पाहुन केज विकास संघर्ष समितिने या कामात लक्ष घालून यासाठी पाठपुरावा केला. यासाठी समितीचे समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे, महेश जाजू, जे डी देशमुख, फारूक कुरेशी, भाई मोहन गुंड, विनोद शिंदे आणि पत्रकार संघ इतर ग्रामस्थांच्या सहभागाने अडीच वर्षात चौदा आंदोलने करुन पाठपुरावा केल्याने काम अत्यंत उत्कृष्ट व लवकर पूर्ण व्ह्यायला मदत झाली. आता या बसस्थानकाचे मुख्य इमारत व वाहनतळाचे बांधकाम पूर्ण झाले असुन संरक्षक भिंत व शौचाल्याचे काम पुढील एक ते दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन समितिला देण्यात आले आहे. या बसस्थानकात सोमवार बसगाड्याना प्रवेश सुरु करण्यात येणार होता. मात्र स्थानिक संधीसाधु पुढाऱ्यांनी या बस्थानकाचे श्रेय लाटण्यासाठी बस गाड्या मध्ये टाकण्यास विरोध करुन रांगोळी स्पर्धा रद्द केली. मात्र उदघाटन केजच्या मुलींच्या उपस्थितीतीत करण्याच्या निर्णय समितिने घेतला असून यनिमित्ताने समितिने 11 फेब्रुवारी रविवारी सायंकाळी 4 वाजता उदघाटन करणार असल्याचे केज विकास संघर्ष समीतीच्या वतीने सांगण्यात आले.
Add new comment