बीड जिल्हयात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान - पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी घेतली तातडीने दखल ; पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांना दिले आदेश
बीड ------
बीड तालुक्यासह माजलगांव आणि गेवराई तालुक्याला आज सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हाधिका-यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयात आज सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. पण याचा सर्वाधिक फटका बीड, माजलगांव व गेवराई तालुक्याला बसला. बीड तालुक्यातील वांगी, शिवणी, माजलगांव तालुक्यातील काळेगाव, हिवरा, डुबाथडी, तालखेडचा परिसर, केसापूरी शिवार, गेवराई तालुक्यातील खळेगांव, पौळाची वाडी आदी गावांमध्ये मोठ्या गारांसह पडलेल्या पावसाने गहू, ज्वारी पिकांसह आंबा, डाळिंब आदी फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ना पंकजाताई मुंडेंनी दिले आदेश
----------------------------
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी तातडीने दखल घेत सकाळीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले. नुकसानग्रस्त गावांना लवकरच आपण भेट देणार असून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.
Add new comment