रस्त्यानंतर आता पाणीपुरवठा योजनेची कामे; इस्लामपुरा भागातील पाईपलाईनचा डॉ.भारतभूषण यांच्याहस्ते शुभारंभ

बीड (प्रतिनिधी) नगर पालिकेअंतर्गत शहरभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी हाती घेतले आहे. रस्त्यांची कामे अंतीम टप्प्यात असुन आता पाणीपुरवठा योजनेची कामे डॉ.क्षीरसागर यांनी हाती घेतली आहेत. आज दुपारी इस्लामपुरा भागातील नवीन पाईपलाईनचा शुभारंभ त्यांच्याहस्ते झाला. यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी त्या भागातील नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पेठ बीड भागातील इस्लामपुरा, राजु बेकरी परिसर, चांदतारा, शहीनशहॉवली दर्गा मागील भाग, तीन मस्जीद चौक
 
 
या परिसरातील नागरीकांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी या भागातील नगरसेवक सय्यद इलीयास व एम.आय.एमचे मुन्ना ईनामदार यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे नविन पाईप लाईन, कॉक्रीट नाली काम आणि क्रॉसींगची कामे करण्याबाबत मागणी केली होती. त्यानूसार आज शनिवार रोजी नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांनी या भागाची पाहणी करून नागरी समस्या जाणून घेतल्या तसेच या भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नविन पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभेला. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नगर पालिकेने हे काम हाती घेतल्यामुळे या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यार आहे. यावेळी न.प.अभियंता किरण देशमुख, टाकळे यांच्या सह परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.