लाइव न्यूज़
हैद्राबाद आणि लिंबे जळगाव येथील धार्मिक कार्यक्रमासाठी विशेष बस सोडा-शेख निजाम
बीड (प्रतिनिधी) तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथे दि.१० फेब्रुवारी रोजी तहफुज ए शिरीयत या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच औरंगाबाद येथील मौजे लिंबे जळगाव येथेही तीन दिवसीय राज्यस्तरीय इज्तेमा साठी बीड जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने समाजबांधव जाणार आहेत. या दोन्ही धार्मिक कार्यक्रमांसाठी विशेष बस सोडाव्यात अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी केले आहे.
हैद्राबाद आणि लिंबे जळगाव या दोन्ही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या दोन्ही कार्यक्रमाला मोठ मोठे धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत. दोन्ही कार्यक्रमांसाठी बीड जिल्ह्यातील लोक या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची येण्या-जाण्याची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने याची दखल घेवून दि.९ आणि १० फेब्रुवारी रोजी हैद्राबादकडे जाणारी विशेष गाडीची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे दि.१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी हैद्राबादकडून परत बीडकडे येण्यासाठी बसची सोय करावी. औरंगाबाद येथील मौजे लिंबे जळगाव येथेही तीन दिवसीय राज्यस्तरीय इज्तेमा होणार असून यासाठी जिल्ह्यातील सर्व आगारांमधून विशेष बसेस सोडणे आवश्यक आहे. दि.२२ फेब्रुवारी पासून २७ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व आगारातून विशेष बस गाड्या सोडाव्यात आणि त्याचे वेळापत्रक स्थानिक वर्तमानपत्रातून आपल्या कार्यालयाकडून प्रसिध्द कराव्यात. अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी केली आहे.
Add new comment