लातूर येथे 9,10 व 11 फेब्रुवारी रोजी 2 रे आदिवासी धनगर साहित्य संमेलन -अंबाजोगाईत बैठक
अंबाजोगाई (प्रतिनिधी) आदिवासी धनगर साहित्य परिषद आयोजित दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे 9,10 व 11 फेब्रुवारी 2018 असे तीन दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर येथे आयोजित करण्यात आले असून या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.या संमेलनात जास्तीत जास्त रसिक,श्रोते व समाज बांधवांनी सहभागी होवून तीनही दिवस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या संमेलनात जास्तीत जास्त आदिवासी व धनगर समाज बांधव,साहित्यिक सहभागी व्हावेत यासाठी अंबाजोगाईतील शासकिय विश्रामगृह येथे नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस धनगर साहित्य परीषदेचे अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले,
लातूर येथील नियोजित आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे
कोषाध्यक्ष संभाजी सुळ,लातूर येथील नियोजित आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे प्रसिध्दीप्रमुख अमोल पांढरे,मराठवाडा समन्वयक चंद्रकांत हजारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
अंबाजोगाईत संमेलनाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत दिलेली माहिती पुढीलप्रमाणे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांच्या हस्ते व प्रा.डॉ.सुर्यनारायण रणभुसे,प्राचार्य नागनाथ मोटे,प्राचार्य नागोराव कुंभार,प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर समारोप डॉ.कांचा इलैय्या यांच्या अध्यक्षतेखाली व ना.राम शिंदे,
ना.महादेव जानकर, खा.डॉ.विकास महात्मे, लक्ष्णमराव चिंगळे, आ.गणपतराव देशमुख, आ.अनिल गोटे, आ.रामराव वडकुते, आ.नारायणराव पाटील, आ.दत्तात्रय भरणे, गणेश हाके यांच्या उपस्थितीत होणार आहे.या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.आण्णाराव पाटील हे आहेत.अशी माहिती देवून हे साहित्य संमेलन तीन दिवस चालणार आहे.पहिल्या दिवशी 9 फेब्रुवारी रोजी सायं. 4 वा.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा नवीन रेणापुर नाका येथून ग्रंथदिंडी व शोभायाञा निघणार आहे.ग्रंथदिंडीचे उद्घाटन धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे हे करणार आहेत. तर रात्री 9 वा समाज बांधवाचे “मनोरंजन व प्रबोधनपर" कार्यक्रम आयोजित करण्यता आला आहे.दुसर्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 12 साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.विविध विषयांवरील परीसंवादात साहित्य,
समाजकारण,शिक्षण व इतर सर्व क्षेञातील जाणकार लेखक, कवी, विचारवंत हे सहभागी होणार आहेत. आदिवासी धनगर साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उदघाटन,परीसंवाद, व्याख्यान,कविसंमेलन, कथाकथन,आदींसह भरगच्च कार्यक्रम आहेत. समाजाच्या विविध क्षेञात कार्यरत मान्यवर,विचारवंत,
सन्माननिय व्यक्ती, उपस्थित राहतील.त्यांचे मौलिक विचार ऐकता येतील.तरी या साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या बैठकीद्वारे करण्यात आले आहे.या बैठकीस अंबाजोगाईतील
अॅड.व्ही.डी.शिंदे,
कमलाकर हेडे, गजलकार डॉ.देवराज चामनर,अॅड.दिलीप चामनर,भाऊराव गवळी,बाबुराव गडदे, प्रा.नामदेव हेडे, डॉ.सुर्यकांत भुरे, प्रा.महेश चौरे,राजेश खोडवे,प्रा.किसन शिनगारे,अशोक करे, सुदर्शन काळे,निळकंठ गडदे,अभिमन्यू शेंडगे, विनोद गुरव,योगेश गुंडरे,अॅड.भुरे,जालिंदर पडूळे,दत्ता वाकसे, प्रा.जिजाराम कावळे, कृष्णा काकडे,राम पाटील यासहीत विविध मान्यवर समाजबांधव उपस्थित होते
Add new comment