लाइव न्यूज़
जि.प.अध्यक्षा सविताताईंची तत्परता; आठशे नवीन वर्ग खोल्यांसाठी अर्थमंत्र्यांना साकडे
बीड (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविताताई गोल्हार यांनी तत्परता दाखत जिल्ह्यातील जि.प.शाळांच्या वर्ग खोल्यांसाठी निधी मिळावा म्हणून थेट अर्थमंत्र्यांकडे मागणी केली. जिल्हा परिषदेच्या आठशे नवीन वर्ग खोल्या बांधणीसाठी निधी द्यावा त्याचबरोबर बोंडअळीने बाधीत झालेल्या शेतमालकांना भरीव मदत द्यावी अशी मागणीही सविताताई गोल्हार यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविताताई गोल्हार यांनी पदभार घेतल्यापासून विविध विकास कामांना प्राधान्य दिले आहे. ज्ञानमंदिरात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे त्यांनी विशेष लक्ष दिले असून त्यांना मिळणार्या पायाभूत सुविधा देखील त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य वर्ग खोली आहे का?, त्याठिकाणी उपलब्ध सुविधांमध्ये विद्यार्थी समाधानी आहेत का? या प्रश्नांचीही त्यांनी दखल घेतली. त्याचदृष्टीकोनातून शाळांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव सभागहात मांडण्यात आला. खासदार प्रितमताई मुुंडे यांनी देखील शाळांच्या दुरूस्तीसंदर्भात ठोस पावले उचलत खासदार फंडातून निधी दिला. औरंगाबाद येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये सविताताईंनी तत्परता दाखवत आठशे नवीन वर्ग खोल्यांच्या कामांसाठी आवश्यक निधीकरीता थेट अर्थमंत्र्यांना साकडे घातले. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वर्ग खोल्यांबरोबरच बोंड अळी बाधीत शेतकर्यांना भरीव मदत करण्याची मागणीही गोल्हार यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. गोल्हार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे येणार्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी भरीव निधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Add new comment