लाइव न्यूज़
मॉडल इंग्लीश हायस्कुलची मशाल कवायत ठरली लक्षवेधी ;माजी आ.सिराज देशमुख यांच्याहस्ते क्रिडा सप्ताहाचे उदघाटन
Beed Citizen | Updated: February 7, 2018 - 2:47pm
बीड (प्रतिनिधी) शहरातील जिजामाता चौक मसरत नगर येथील मॉडल इंग्लीश हायस्कूलच्या क्रिडा सप्ताहाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आ.सिराज देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मॉडल इंग्लीश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली मशाल कवायत लक्षवेधी ठरली. प्रथमच झालेल्या या कवायतीची पालकांनी भरभरून प्रशंसा केली.
सफदरअली देशमुख वेलफेअर ट्रस्ट संचलीत मॉडल इंग्लीश हायस्कूलच्या क्रिडा सप्ताहाचे उदघाटन माजी आ.सिराज देशमुख यांच्याहस्ते झाले. यावेळी सचिव सुजात अली देशमुख, शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य परवेज युसूफ जई, प्रा.शेख बदीयोद्दीन आदिंची प्रमुख उपस्थिती होती. इंग्लीश हायस्कूलमधील नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या विद्यार्थ्यांनी कॉईन रेस, रिंग ड्रीलचे सादरीकरण केले. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मनोरे, खो-खो, कबड्डी, क्रिकेट, लेझीम, कराटे आदिंचे सादरीकरण केले. यावेळी सादर केलेल्या मशाल कवायतीने पालकांचे लक्ष वेधून घेतले. क्रिडा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या मारिया बीडवाला यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर वृंदांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरणानंतर आभार उपप्राचार्य चंद्रकांत देशमुख यांन मानले.
Add new comment