सावधान! आधार कार्ड लॅमिनेट केल्यास होणार निकामी: UIDAI
नवी दिल्ली: तुम्ही तुमच्या आधार कार्डला लॅमिनेशन केले आहे का?, किंवा मग प्लास्टिक स्मार्ट कार्डाच्या रुपात बनवले आहे का? या प्रश्नांची उत्तरे होय अशी असतील तर मग तुमचे आधार कार्ड काही कामाचे नाही असे समजा! असे केल्याने तुमच्या आधार कार्डाचा क्विक रेस्पॉन्स को़ड (क्यूआर कोड) निकामी होणार आहे. UIDAIने ही माहिती प्रसिद्ध केली असून याबाबत चिंताही व्यक्त केली आहे
याबाबत UIDAIने निवेदन प्रसिद्ध केले असून, आधार कार्डला लॅमिनेट केले किंवा त्याचे प्लास्टिक स्मार्ट कार्ड बनवले तर तुमची परवानगी न घेताच तुमची सर्व माहिती चोरीला जाऊ शकते असे सांगत UIDAIने सावधगिरीचा सल्ला दिला आहे.
प्लास्टिक किंवा पीव्हीसी आधार स्मार्ट कार्डाची काहीएक गरज नाही. असे केल्याने क्यूआर कोड चालतच नाही. अशा प्रकारच्या अनधिकृत छपाईमुळे क्यूआर कोड निकामी होतो असे UIDAIने म्हटले आहे. शिवाय, आधार स्मार्ट कार्डच्या छपाईसाठी ५० ते ३०० रुपयांपर्यंत खर्च येतो आणि तो अवाजवी असल्याचे UIDAIचे म्हणणे आहे.
Add new comment